आनंददायी शनिवार कृतीपुस्तिका

 आनंददायी शनिवार उपक्रम



उपक्रमाविषयी जाणून घेऊया..

आपल्या राष्ट्राची भावी पिढी गतिमान बनविण्यासाठी समावेशक आणि बहुउद्देशीय समाज

निर्मितीसाठी मोलाचे योगदान देतील असे कार्यमग्न, उत्पादक व योगदान देणाऱ्या नागरिकांची निर्मिती

करणे, हे महत्त्वाचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद केले आहे. २१व्या शतकातील

कौशल्ये, व्यावहारिक कौशल्ये, चांगल्या सवयी, लोकशाही मूल्य संपादन करून एक सुजाण नागरिक

घडवण्यासाठी शालेय शिक्षणात 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे.

'आनंददायी शनिवार' या उपक्रमातून अभ्यासक्रम व अभ्यासपूरक उपक्रम तसेच व्यावसायिक व

शैक्षणिक प्रवाह यातील विभाजन दूर करून आनंददायी वातावरणात विदयार्थी घडणार आहेत.

विदयार्थ्यांमध्ये अनेक कौशल्यांची निर्मिती या उपक्रमातून साध्य होणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या

विदयार्थ्यांना विविध प्रकारच्या उपक्रमांतून कृतींद्वारे, प्रात्यक्षिकांद्वारे अध्ययन अनुभव उपलब्ध केले

जाणार आहेत. यासाठी वर्गातील व वर्गाबाहेरील आनंददायी उपक्रमांचे वार्षिक नियोजन करायचे आहे. या

उपक्रमातून सर्वसमावेशक शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्तरनिहाय अनुभव देण्याचे मार्गदर्शन

या कृतिपुस्तिकेतून करण्यात आलेले आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद करण्यात

आलेल्या शैक्षणिक स्तरानुसार उपक्रमांची रचना करण्यात आलेली आहे. याअंतर्गत इयत्ता सहावी

ते आठवीच्या विदयार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी 'दहा दिवस दप्तराविना' या

उपक्रमाची अनिवार्यपणे अंमलबजावणी करायची आहे.

स्थानिक परिस्थितीनुसार विविध उपक्रमांतून विदयार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देणे, अध्ययनाची

गोडी निर्माण करणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, चांगल्या सवयींची निर्मिती करण्यासाठी सर्व शिक्षकांनी

यात स्वतः सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विषयशिक्षक, मुख्याध्यापक यांनी एकत्रित येऊन

पालकांच्या सहभागासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे उपक्रम अभ्यासक्रमाशी पूरक असल्याने उपक्रमांची

रचना करताना, उपक्रम राबवित असताना शिक्षकांच्या सर्जनशीलतेलाही वाव मिळणार आहे.

'आनंददायी शनिवार'च्या माध्यमातून अभ्यासक्रमातून साध्य करायच्या अध्ययन निष्पत्तींसाठी

कृतीपूर्ण उपक्रमांचे सूक्ष्म नियोजन करून आनंददायी उपक्रमांची शालेय स्तरावर इयत्ता पहिली ते

आठवीच्या विदयाथ्र्यांसाठी अंमलबजावणी करायची आहे. यासाठी अनेक उपक्रम नमुनादाखल या

पुस्तिकेतून देण्यात आलेले आहेत. याची अंमलबजावणी करून शालेय जीवन आनंददायी करण्यासाठी

शुभेच्छा !

राहूल रेखावार (भा.प्र.से.)

संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

आनंददायी शनिवार

कृतीपुस्तिक डाऊनलोड करा

👇👇

CLick here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता 1 ली व 2 री साठी अतिशय उपयुक्त

आनंदमला

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖