टॅक्स Excel शीट व सविस्तर माहिती




खालील कॅलक्युलेटर च्या माध्यमातून आपल्याला  2022 -23 या वर्षी लागणार टॅक्स बघता येईल.

टॅक्स कलक्युलेटर


आपला पॅन नं टाका व भरलेला टॅक्स  व मिळणारा रिफंड बघा

Refund status

 

 दिलेल्या शीट मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरा,

पिवळ्या रंगातील रकान्यात आपले बेसिक, तसेच सर्व आयकर साठी लागू असलेल्या  कपाती व्यवस्थित भरा. विवरणपत्र व  फॉर्म नं 16 तयार होईल. प्रिंट काढा.


Sheet 👇

शीट 1👉क्लिक करा

शीट 2 👉 क्लिक करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इन्कम टॅक्स मधे NPS शासन हिस्सा वजावट आता 10% वरुन 14% ..  चालू आर्थिक वर्षात ही घेता येईल लाभ..


नुकतेच केंद्रीय बजट मधे इनकम टॅक्स कलम 80CCD(2) मधे संशोधन करण्यात येऊन राज्य कर्मचाऱ्यांना NPS शासन अंशदान वजावट मर्यादा 10% वरुन 14% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.. हा बदल  1 एप्रिल 2020 पासून पूर्वलक्षी लागू करण्यात आला आहे,त्यामुळे देशभरातील लाखों राज्य कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून प्रत्येकाचा जवळपास किमान 6000रु ते 25000रु इनकम टॅक्स कमी होणार आहे..


याचा लाभ चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी तर होईलच पण मागील 2020-21 या आर्थिक वर्षात NPS योजनेत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना ही लाभ होईल.. व ज्यांना NPS च्या 4% शासन अंशदान रकमेमुळे ज्यादाचा इनकम टॅक्स बसला असेल त्यांना IT रिटर्न द्वारे तेवढा इनकम टॅक्स रिफंड होऊ शकेल..


इनकम टॅक्स मधे NPS ची वजावट.. (updated..) आता खालील प्रमाणे राहील..


आर्थिक वर्ष 2021-22 (आयकर निर्धारण वर्ष 2022-23)


1) NPS स्व हिस्सा (कर्मचारी अंशदान) वजावट.. कलम80CDD1 अंतर्गत कलम 80C* मधे  कर्मचारी स्व हिस्सा रक्कम ही 1.5लाख रु सेविंग मधे दाखवता येईल.. तसेच


 2) NPS स्व हिस्सा(कर्मचारी अंशदान) वजावट  कलम 80CCD(1B)..


(संदर्भ- CBDT, INCOME-TAX, circular no- 4/2020, 16January 2020, (page no.35)


10%NPS कर्मचारी स्व हिश्याची 50,000 रु रक्कम ही NPS मधे additional saving म्हणून कलम 80CCD(1B) अंतर्गत सेविंग करता येते..


उदा- जर एखाद्या शिक्षकाची / कर्मचाऱ्याची NPS ची स्व हिस्सा 10% ची रक्कम ही 80,000रु असेल तर तो शिक्षक/कर्मचारी त्या 80,000रु पैकी 50,000रु  कलम 80CCD(1B) मधे व उर्वरित 30,000रु कलम 80C मधे दाखवू शकतो.. कर्मचारी त्यांच्या 10% स्व हिश्या तील रक्कमच कलम 80CCD(1B) मधे दाखवू शकतात..त्यासाठी त्यांना NPS मधे बाहेरुन भरणा करण्याची गरज नाही.. आणि मूळात NPS धारक कर्मचाऱ्याने जऱ NPS खात्यात बाहेरुन रक्कम भरणा केला तरि ती रक्कम NPS च्या TIRE-2 या खात्यात मधे जमा होईल, आणि TIRE-2 मधील रक्कम आपण कधीही काढू शकत असल्याने TIRE-2 ची रक्कम कलम80CCD(1B) साठी लागू नाही..  तर कर्मचाऱ्यांच्या दरमाह वेतनातून 10% कपात होणारी कर्मचारी स्व हिस्सा NPS कपात रक्कमच 80CCD(1B) मधे दाखवता येते..कारण ही स्व हिस्सा रक्कम NPS च्या TIRE-1 खात्यात जमा होत असते.. 


3)NPS 14% शासन हिस्सा वजावट- कलम 80CCD(2) अंतर्गत वजावट..

(संदर्भ-:-FINANCE BILL, 2022

PROVISIONS RELATING TO 

DIRECT TAXES, पेज नं. 44 व 45...)


आता कलम 80CCD(2) अंतर्गत सर्व 14% NPS शासन हिस्सा आपल्या एकूण उत्पन्नातुन वजावट करण्यात येईल..* पूर्वी राज्य कर्मचारी यांना हा शासन हिस्सा वजावट 14% पैकी 10% पात्र होता, मात्र महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्या पासून च्या सतत प्रयत्नांमुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेला भेदभाव अखेर दूर झाला आहे व याचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना मागील आर्थिक वर्षा पासून म्हणजेच  1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे..म्हणजेच याचा फायदा यावर्षी तसेच मागील 2020-21 वर्षात जास्त टॅक्स पेड केलेल्या NPS धारक कर्मचाऱ्यांना होईल..


प्रश्न- जर 14% NPS शासन हिस्सा एकूण उत्पन्नातुन वजावटच होईल तर मग तो शासन हिस्सा आपल्या उत्पन्नात मिळवायचाच कशाला.? शासन हिस्सा उत्पन्नात नाही मिळवला तर काय फरक पडेल.?*


उत्तर- NPS चा 14%शासन हिस्सा एकूण उत्पन्नात मिळवावाच लागतो..कारण  टेक्निकली तो आपल्या वेतनाचा भाग आहे.. NPS धारक कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मागणी करतांना 100% वेतना ऐवजी 114% वेतन रक्कमेची मागणी करण्यात येते व तेवढी 114% रक्कम आपल्याला प्राप्त होते.. परंतु ती सर्व 14% रक्कम नंतर वजावट होत असल्याने त्यासाठीच कलम 80CCD(2) निर्माण करण्यात आले आहे व कलम 80CCD(2) अंतर्गत तो 14% NPS शासन हिस्सा एकूण उत्पन्नातुन वजावट करण्यात येतो.. 


मग शासन हिस्सा  कशातुन किंवा कोणत्या कलमातून वजावट करावा.?


उत्तर-  आपल्याला मिळणारा NPS मधील शासन हिस्सा कलम 80CCD(2)* मधून वजावट करण्यात येतो..


*संपूर्ण शासन हिस्सा वजावट करता येईल का.?

उत्तर- होय.. आता सर्व 14% शासन हिस्सा वजावट करण्यात येईल..



*शासन हिस्सा 80C सेविंग मधे ही दाखवता येईल का.?


उत्तर - नाही.. शासन हिस्सा फक्त 80CCD(2) मधून वजावट करावा..


*प्रश्न- 14% NPS शासन हिस्सा वजावट चालू आर्थिक वर्षात वजावट करता येईल का..?


उत्तर- होय.. चालू आर्थिक वर्षात 14% NPS शासन हिस्सा वजावट करता येईल...


*प्रश्न-ज्यांनी यापूर्वी NPS शासन वजावट 14% पैकी 10% दाखवली आहे त्यांनी आता काय करावे..?


उत्तर- ज्यांनी यापूर्वी शासन हिस्सा 10% वजावट दाखवला होता त्यांनी आता पुन्हा आपले विवरण पत्र बदलून घ्यावे.. व सर्व 14%NPS रक्कम 80CCD(2) मधे दाखवावी.. व नवीन 16 नं. फॉर्म बनवून घ्यावा...


*प्रश्न-ज्यांचा इनकम टॅक्स आधिच कपात केला गेला असेल त्यांनी काय करावे.?


उत्तर-  त्यांनी भविष्यात इनकम टॅक्स रिटर्न दाखल करून त्यावेळी 80CCD(2) अंतगर्त  सर्व 14% शासन हिस्सा रक्कम दाखवून आपले करपात्र उत्पन्न कमी करून घ्यावे, व  ज्यादा कापलेला  टॅक्स परत मिळवावा.. 


तसेच अजुन एक महत्वपूर्ण विषय सांगावासा वाटतो की ज्यांना DA च्या 5% फरकाच्या(DA 12%वरुन17%) रकमेमुळे व 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या 2ऱ्या हप्त्यामुळे यावर्षी इनकम वाढुन टॅक्स बसत असेल तर आपण कलम 89(1) अंतर्गत  ही फरक रक्कम यावर्षी च्या एकूण उत्पन्नातुन वजावट दाखवून आपले यावर्षी चे एकूण उत्पन्न  कमी दाखवू शकतो.. मात्र इनकम टॅक्स च्या वेबसाइट वरुन ऑनलाइन फॉर्म नं 10E भरून ही फरकाची रक्कम ज्या आर्थिक वर्षातील आहे त्या आर्थिक वर्षातील इनकम टॅक्स मधे दाखवावी लागते.. (उदा. DA फरक हा 1जुलाई2019 ते 30नोव्हें2021 अखेर चा आहे, तो फरक सन 2019-20 च्या इनकम टॅक्स मधे दाखवावा लागेल..) व तिथे ही फरक रक्कम add झाल्याने जऱ त्या वर्षाच्या स्लैब नूसार इनकम टॅक्स बसत असेल तर तेवढा इनकम टॅक्स यावर्षी भरावा लागतो..


10E फॉर्म भरण्या पूर्वी मागील वर्षाचे इनकम टॅक्स विवरणपत्र / फॉर्म नं 16 /ITR सोबत ठेवावा जेणेकरून मागील एकूण उत्पन्नात ही फरकाची रक्कम add करून कैलकुलेशन करून टॅक्स आकारणी करता येईल..


10E बाबत च्या अधिक माहिती साठी आपण इनकम टॅक्स वेबसाइट वरुन माहिती घेऊ शकतात किंवा youtube वर वीडियो बघू शकतात...


तसेच अनेक जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगाच्या 2ऱ्यां हप्त्याची रक्कम मिळाली नसताना देखील विवरण पत्रात add करायला लावली आहे.. जर ही फरक रक्कम 31मार्च 2022 पूर्वी अपल्या खात्यावर जमा झाली नाही तर ही रक्कम यावर्षी दाखवून काही एक उपयोग होणार नाही, उलट या रकमेमुळे आपल्याला जास्तीचा इनकम टॅक्स भरावा लागेल.. कारण 1 एप्रिल पासून पुढील नवीन आर्थिक वर्ष सुरु होते.. आणि ही रक्कम 1एप्रिल नंतर मिळाली तर तिची गणना पुढील आर्थिक वर्षाचे उत्पन्न म्हणून होईल.. म्हणून जो पर्यंत फरक रक्कम मिळत नाही तोपर्यंत ती उत्पन्नात दाखवू नये...


  आणि समजा असे झाले की ही 7वा वेतन आयोग 2रा हप्ता फरक रक्कम या वर्षी विवरण पत्र भरत असतांना दाखवली नाही , मात्र याच वर्षी फेब्रु च्या वेतनात ती रक्कम 31मार्च च्या आधी पगार खात्यात जमा झाली तर अश्या वेळी आपण भविष्यात इनकम टॅक्स रिटर्न दाखल करतांना या वेतन फरक रक्कमेला आपल्या 2021-22 च्या एकूण उत्पन्नात add करून घेऊ शकतो आणि त्यांवर जऱ इनकम टॅक्स paid करु शकतो तथापि आपल्या कडे या फरकाच्या रकमेमुळे बसणारा इनकम टॅक्स वाचवण्याचे 2 पर्याय उपलब्ध आहेत.. 

१) 31 मार्च पुर्वी फरक रक्कम मिळाल्या नंतर लगेचच तेवढी रक्कम 80C मधे सेविंग करून घेणे.. 

अथवा 

२) IT रिटर्न भरतांना कलम 89(1) अंतर्गत ही फरक रक्कम 2021-22 मधून वजावट दाखवून वर सांगितल्या प्रमाणे संबंधित आर्थिक वर्षात दाखवून फॉर्म नं 10E भरून टॅक्स कैलक्यूलेट करून घ्यावा..


मित्रांनो महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अंतिम ध्येय हे जुनी पेन्शन हेच आहे.. मात्र कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेल्या या NPS योजने मधे इनकम टॅक्स च्या बाबतीत अन्याय दूर करून आपल्या कर्मचारी बांधवांना माहिती देऊन त्यांचे आर्थिक नुकसान न होऊ देणे हे ही महत्वाचे आहे, म्हणून हा लेख प्रपंच आहे..


माहितीस्तव...


*टिप- या पोस्ट सोबत 14% NPS शासन अंशदान वजावट बाबत व कलम 80CCD(1B) बाबत पुरावे म्हणून 2 pdf त्या दोन्ही Pdf मधील संबंधित 2 screen शॉट फोटो पाठवत आहे, कृपया हा msg/post शेयर करत असतांना दोन्ही pdf व दोन्ही स्क्रीन शॉट फ़ोटो  शेयर  करावेत जेणेकरून काही ठिकाणी ऑफिस कडून अथवा टॅक्स कैन्सल्टेंट कडून वरील कलमात डिडक्शन साठी जो पुरावा मागितला जातो तो पुरावा आपले शिक्षक/ कर्मचारी त्यांना दाखवू शकतील..


केंद्रीय बजट हे संसदेत मंजूर झालेले असल्याने बजट ची pdf कॉपी ही 14% NPS वजावट साठी पुरावा म्हणून ग्राह्य आहे..लवकरच इनकम टॅक्स चे याबाबत स्वतंत्र circular ही येईल , आपण ते वेबसाइट वरुन नंतर डाऊनलोड करू शकतात..


धन्यवाद..


  🙏🏻

आपलाच

विनायक चौथे,

महा.राज्य जुनी पेंशन संघटना..

प्राथ शिक्षक रावेर(जळगाव)..

Mob-9028156057

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इनकम टॅक्स मधे  राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी NPS मधील शासन अंशदान वजावट मर्यादा 10% वरून 14% पर्यंत वाढली..

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश.

       महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने च्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यापासून इनकम टॅक्स मधे राज्य कर्मचाऱ्यांना ही NPS शासन अंशदान वजावट 10% वरुन 14 % करण्यात यावी  सुरु असलेल्या सततच्या प्रयत्नांना आज यश आले आहे.. 

     आज संसदेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार द्वारे देशातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना इनकम टॅक्स मधील NPS शासन अंशदान वजावट 10% वरुन 14% करण्यात आली आहे..

तशी घोषणा आज वित्त मंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय बजट सादर करतांना केली.. 

    आयकर कलम 80CCD(2) अंतर्गत जऱ केंद्रीय कर्मचाऱ्यांना सर्व 14% NPS शासन अंशदान  वजावट मिळते तर राज्य कर्मचाऱ्यांना ही वजावट फक्त 10% का.? असा प्रश्न उपस्थित करून NPS च्या या 4% शासन रक्कमे मुळे व एकूण उत्पन्न वाढत असून अनेक NPS कर्मचाऱ्यांचे करपात्र उत्पन्न 5लाख रु च्या वर गेल्या मुळे अनेक राज्य कर्मचाऱ्यांना 12500रु रीबीट मिळत नसल्याने त्यांना 15,000रु ते 20,000रु इतका जास्त इनकम टॅक्स येत असल्याचे 24ऑक्टोबर2021 रोजी च ऑनलाईन तक्रार च्या माध्यमातून इनकम टॅक्स डिपार्टमेंट ला निदर्शनास आणून दिले व त्यानंतर इनकम टॅक्स कडून आपल्याला अधिकृतपणे कळवण्यात आले की *"सदर तक्रार च्या माध्यमातून आपण सूचवलेला विषय पुढील कार्यवाही साठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला आहे.."

   या रिप्लाई नंतर देखील सदर विषय मार्गी लागावा यासाठी  केंद्रीय वित्त मंत्री व संबंधित अधिकारी यांच्याकडे ट्विटर वर पाठपुरावा सुरु होता..

त्यानुसार आज इनकम टॅक्स कलम 80CCD(2) मधे संशोधन करण्यात येऊन देशातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे...

    तथापि हा लाभ / बदल राज्य कर्मचाऱ्यांना 1एप्रिल2022 पासून म्हणजेच पुढच्या आर्थिक वर्ष 2022-23 साठी लागू होईल.. व याचा लाभ पुढील वर्षी च्या इनकम टॅक्स मधे मिळेल..

या बदला मुळे पुढील वर्षा पासून NPS धारक राज्य कर्मचाऱ्यांचा जवळपास सरासरी 15,000रु ते 20,000 इनकम टॅक्स वाचणार आहे..

माहितीस्तव...!!


धन्यवाद!! 


   🙏🏻

आपलाच

*विनायक चौथे* (प्रा.शिक्षक,रावेर,जळगाव)

 *महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना..*

(Mob- 9028156057)

इनकम टॅक्स मधे NPS ची वजावट..


आर्थिक वर्ष 2021-22 (आयकर निर्धारण वर्ष 2022-23)

1) NPS स्व हिस्सा (कर्मचारी अंशदान) वजावट.कलम80CDD1 अंतर्गत कलम 80C* मधे  1.5लाख रु वजावट...

NPS चे कर्मचारी अंशदान (स्व हिस्सा) हा कलम 80C च्या अंतर्गत 1.5लाख रु सेविंग मधे दाखवता येईल..

 2) NPS स्व हिस्सा(कर्मचारी अंशदान) वजावट  कलम 80CCD(1B)..

याअंतर्गत NPS ची  50,000रु पर्यंत extra saving करता येते..]

जर एखाद्या शिक्षकाची/कर्मचाऱ्याची LIC, PPF, RD/ होम लोन मुद्दल इत्यादि रक्कम मिळून 1.5 लाख रु लिमिट  जवळपास पूर्ण होत असेल तर अश्या शिक्षक/कर्मचाऱ्यांनी NPSमधील स्व(कर्मचारी) हिस्सा रक्कम ही 1.5लाख रु होई पर्यंत 80C मधे दाखवावी व उर्वरित रक्कम  80CCD(1B) मधे (NPS एक्स्ट्रा 50,000 रु पर्यंत) मधे दाखवावी.. 

उदा. जर माझी LIC, PPF, RD इत्यादि सेविंग हिच जऱ (1.4लाख रु) 1,40,000रु होत असेल, तर अश्यावेळी 80C मधे 1.5 लाख रु होण्यासाठी मी माझ्या NPS स्व हिस्सा मधुन 10हजार रु  80C मधे दाखवेल,

 व उर्वरीत NPS स्व हिस्सा रक्कम (50,000रु लिमिट पर्यंत) हा कलम 80CCD(1B) अंतर्गत टाकेल..

3)NPS शासन हिस्सा वजावट- कलम 80CCD(2) अंतर्गत वजावट..

प्रश्न - आपल्याला मिळणारा शासन हिस्सा उत्पन्नात मिळवावा का.?

उत्तर- होय..

शासन हिस्सा 80C सेविंग मधे ही दाखवता येईल का.?


उत्तर - नाही..

मग शासन हिस्सा  कशातुन किंवा कोणत्या कलमातून वजावट करावा.?*


उत्तर-  आपल्याला मिळणारा NPS मधील शासन हिस्सा कलम 80CCD(2) मधून वजावट करण्यात येतो..

संपूर्ण शासन हिस्सा वजावट करता येतो का.?

उत्तर- नाही..

सध्या राज्य कर्मचारी यांना फक्त 10% पर्यंत च वजावट करण्या संदर्भात नियम आहे..

14% पैकी 10% शासन हिस्सा वजावट करणे म्हणजे नेमक कसे,? माझे वेतन 50000रु आहे, मला दरमाह 14% प्रमाणे 7000रु शासन हिस्सा मिळतो..

मग  80CCD(1B) मधे यांतील किती शासन हिस्सा वजावट टाकावा.?

उत्तर-

उदा- समजा तुमचे वेतन(बेसिक+DA) = 50,000 रु असेल तर तुम्हाला दरमाह 14% प्रमाणे 

50000×14% = 7000रु शासन हिस्सा मिळतो..

(त्यानंतर तुमचे एकूण मासिक वेतन 570000₹ असे होते..)

यानुसार  तुमचा NPS चा एकूण वार्षिक शासन हिस्सा 7000 रु×12 महीने = 84000 रु होते..

या वार्षिक 84000₹ शासन अंशदान पैकी 

दरमाह 5हजार रु प्रमाणे  एकूण 12महीने ×5000रु = 60,000रु  शासन अंशदानाची रक्कम 

हा शासन हिस्सा म्हणून 80CCD(2) मधून वजावट होईल..

तर  84000 रु शासन हिस्सा पैकी उर्वरित 24000 रु आपल्या एकूण उत्पन्नात तसेच शेवट पर्यंत कायम राहतील व त्यावर इनकम टैक्स द्यावा लागेल..

(टिप- सर्व 14% NPS शासन अंशदान रक्कम एकूण उत्पन्नातुन वजावट व्हावी यासाठी ही आपले प्रयत्न सुरु आहे, आपण इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडे दाखल केलेल्या तक्रार वर सध्या कामकाज सुरु आहे, पण अद्याप याबाबत लेखी बदल निर्णय नसल्याने वरील नूसारच वजावट करावी लागेल .)


धन्यवाद..🙏🏻


आपलाच

विनायक चौथे

महा.राज्य जुनी पेंशन संघटना

Mob-9028156057


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖