इयत्ता 10 वी निकाल 2024

 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर 

सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत 6 संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

👇निकाल फास्ट बघण्यासाठी क्लिक करा👇


१. 👉https://mahresult.nic.in


२. 👉http://sscresult.mkcl.org


३. 👉https://sscresult.mahahsscboard.in


४.👉 https://results.digilocker.gov.in


५.👉https://results.targetpublications.org


६.👉 https://www.tv9marathi.com



माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे

विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंटआउट) घेता येईल.

https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची

इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. होईल. १)तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन

(http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८/०५/२०२४ ते मंगळवार, दिनांक ११/०६/ २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card / UPI / Net Banking याद्वारे भरता येईल.