INSPIRE Award 2024-25 नोंदणी सुरू


विषय:- INSPIRE Award MANAK योजना सन २०२३ २४ करीता Online नामांकने सादर करणेबाबत.



संदर्भ :- १) मा. नमिता गुप्ता HEAD (INSPIRE MANAK) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.DST/ INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2024-25

विषय उपरोक्त संदर्भाकीत विषयावे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सन २०२४-२४ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्याचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स

नामांकने सादर करण्याचा कालावधी ०१ जुलै २०२४ पासून सुरू झाले असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच ज्या

शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.

सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या

सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे.

त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.

(डॉ. हर्षलता बुराडे) संचालक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)

रविनगर, नागपूर.

मुदत- 1 जुलै ते 15 सप्टेंबर 2024

 पोर्टलवर नोंदणी करण्यासठी क्लिक करा

 E-MIAS portal

https://www.inspireawards-dst.gov.in/userp/school-authority.aspx

👉रजिष्ट्रेशन कसे करावे व्हिडीओ

 या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत

👇👇

www.inspireawards-dst.gov.in 


परिपत्रक डाऊनलोडसाठी उपलब्ध


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖