15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सोपी व छोटी भाषणे
🇮🇳 मराठी भाषणे PDF 🇮🇳
👉 डाऊनलोड
मराठी भाषणे PDF (5 ते 8 वर्ग)
🇮🇳 इंग्रजी भाषणे PDF 🇮🇳
🇮🇳 हिंदी भाषणे PDF 🇮🇳
1👉 डाऊनलोड
2👉डाऊनलोड
🇮🇳 संस्कृत भाषणे PDF 🇮🇳
🇮🇳 हस्तलिखित भाषणे 🇮🇳
🇮🇳 स्वातंत्र्य दिन रांगोळी 🇮🇳
🇮🇳स्वातंत्र्य दिन फलकलेखन🇮🇳
डाऊनलोड01
🇮🇳घोषवाक्ये 🇮🇳
देशभक्तीपर MP3 गीते
🇮🇳रंग भरण स्पर्धा PDf🇮🇳
1)डाउनलोड
2)डाऊनलोड
🇮🇳 स्फूर्तीगीते PDf 🇮🇳
🇮🇳 निबंध माझा आवडता देशभक्त🇮🇳
🇮🇳 निमंत्रण पत्रिका🇮🇳
🇮🇳सूत्रसंचालन🇮🇳
🇮🇳आभार प्रदर्शन🇮🇳
🇮🇳 रिमिक्स गाणे नृत्यासाठी 🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👇स्पर्धेत क्रमांक प्राप्त भाषणे 👇
15 ऑगस्ट भाषण क्र. 1 (अमृत महोत्सवानिमित्त)
अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,आज मी तुम्हांला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज 15 ऑगस्ट 2022. आज, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज देशभरात आपल्या देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य सोहळा साजरा होत आहे. अवघा देश जल्लोषात न्हावून निघाला आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार ठरले आहोत, हे आपले मोठे भाग्यच !
मित्रांनो, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, लाल किल्ल्यापासून ते गाव, खेड्यांपर्यंत आज सगळीकडे एकच घोषणा दुमदुमत आहे - भारत माता की जय ! देशभर आनंदाची लहर पसरली आहे. आज प्रत्येक भारतीयासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण सर्वांनी उपभोगलं आहे.त्या अगोदर दिडशेहून जास्त वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता.या दोन्ही टप्प्यांचा लेखाजोखा मांडला तर आपल्या हाती काय लागते ? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा काळ आता इतिहास झाला आहे. या काळाचे 'नव्या भारताच्या उभारणीचा काळ' असेच वर्णन करावे लागेल. या काळात भारताने कृषी, औद्योगिक, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. अवघ्या जगाला कवेत घेण्याची आमची क्षमता आहे हे या काळात भारताने दाखवून दिले.याच काळात आपल्या देशाने साऱ्या विश्वाचे नेतृत्व करण्याची क्षमता कमावाली. आपल्या सर्वसमावेशक संस्कृतीचा उद्घोष केला.सर्वांगीन विकासाचे प्रारूप आपल्या देशाने तयार केले. अवघ्या जगाला एकात्मतेची शिकवण दिली. ही प्रगती होत असताना भारताची 'व्यापक सांस्कृतिक पार्श्वभूमी' महत्वपूर्ण ठरली. त्यामुळेच आपला देश आकाशात उंच भरारी मारत असताना पाय मात्र जमिनीवर ठेवू शकला. मित्रांनो, हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या आहुतीने आपल्याला 75 वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या क्षणी त्या महान क्रांतिकारकांचे स्मरण प्रत्येक देशवासीयांनी करायला हवे. त्यांनी शिकवलेली त्यागाची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आपल्या देशाचा तिरंगा उंचच उंच फडकत राहण्यासाठी कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आले तरी आपण डगमगता कामा नये. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला ! हेच आपले जीवनगाणे असायला हवे... जय हिंद जय महाराष्ट्र !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
15 ऑगस्ट भाषण क्र. 02
अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,आज मी तुम्हांला 15 ऑगस्ट बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याअगोदर सुमारे दिडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला. आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. याकाळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले.मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे ? इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा ? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे ? जिथे सोने उगवले जाते त्या आपल्या देशाची संपत्ती उघड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल !
ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकरं तयार झाली.इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला अशक्य कोटीतील लक्ष्य होते ! पण, नेताजी सुभाषचंद्र बोस,विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी ! या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला. सामर्थ्यवान इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढयात भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकावले. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले.महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्यांच्या लढयात उडी घेतली.चारही बाजुंनी इंग्रजांना घेरण्यात आले. आणि शेवटी तो सुवर्णदिन आला ! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे दीडशे वर्षाची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले होते. दीडशे वर्ष या भारतभूमीवर फडकणारा 'युनियन जॅक' खाली घेण्यात आला आणि 'तिरंगा' अभिमानाने फडकवण्यात आला.भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले, त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो व मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद, जय भारत !

