1 मिनिटाच्या आत तयार होत. करून बघा. प्रथम site वर जाऊन आपला आधार कार्ड no. टाका. नंतर text Otp येईल. Download करा. झाल तयार. या कार्ड मार्फतच मेडिकल लाभ या पुढे मिळेल. 5 लाखाच्या आत मेडिकल file आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी हे ABHA (आयुष्यमान भारत स्वास्थ्य खाते ) काढून घ्या.
GR डाउनलोड करा
विषय- राज्यातील १०० टक्के अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) कार्ड काढणेबाबत.
संदर्भ : १. शासन पत्र क्रमांक : वैद्यप्र-१६५२६/(१४९२५) /टीएनटी-५ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६.
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. शिससमा/ २०२५-२६/टी-७/ आयुष्यमान /६१५५७ दिनांक ०५/०३/२०२६.
उपरोक्त संदर्भाधीन पत्रानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करुन कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली होती.
तथापि, याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ शिधापत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लाख आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुंजय आहेत. या लाभांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरुन सर्वांना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडीओ लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे रु ५.०० लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक शासकीय मानले जाणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



