अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2022- 2023

 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2022- 2023 संपूर्ण प्रक्रिया


✴️शिष्यवृत्ती पात्रतेच्या अटी 

◾️ इयत्ता 1 ली ते 10 वीच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुदानित / विना

अनुदानित/ कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यताप्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे.

◾️अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उतीर्ण झालेला असावा.

◾️पालकाचे (कुटूंबाचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.

◾️पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.

◾️एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरावी.

◾️धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड / आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावीत.

◾️ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तींचा लाभ घेतलेला नसावा.

◾️एकूण पात्र विद्याथ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनीसाठी राखीव आहे... विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतीगृहात राहत असतील अथवा राज्यशासनाच्या वसतीगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वसतिगृहामध्ये भरलेले शुल्काचा पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.

✴️अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

1. विद्यार्थ्याचा फोटो

2. आधार कार्ड / आधारकार्ड स्कॅन केलेली

कॉपी

3. मागील वर्षाचे गुणपत्रक - विद्यार्थ्याला

मागील वर्षी किमान 50% गुण असावेत.

4. उत्पन्नाचा दाखला - उत्पन्नाचा दाखला

मा. तहसीलदार यांचा 1 लाखाच्या

आतमधील असावा.

5. स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला

6. स्वयंघोषित धर्माचा दाखला

7. शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र

8. रहिवासी दाखला

9. विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक

शाखेचा आयएफएससी कोड, विद्यार्थी बँक

पासबूक झेरॉक्स / पासबूक स्कॅन केलेली

कॉपी

10. विद्यार्थ्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र

✴️प्रोफाइल अपडेट करणे

 शाळेचे प्रोफाईल update करण्यासाठी NSP portal open pol institute login page open करा. लॉगिन type institute nodal निवडा.शैक्षणिक वर्ष निवडा. Login करा. Administration वरती click करा. open update profil मध्ये Institute details मध्ये शाळेची माहिती पुढील प्रमाणे भरा.

शाळेचे नाव as per nsp / as per dise या पैकी जे बरोबर असेल ते निवडा. तुम्ही जे न निवडाल त्यावरीलच जिल्हा निवडला जाईल. शाळेचा प्रकार, बोर्ड व राज्य निवडा. शाळेचा पत्ता अचूक भरा. Contact person details मध्ये शाळेच्या नोडलऑफिसर यांची माहिती भरा.यामध्ये आधार कार्ड वरील माहिती भरा

● आधार नंबर, आधार कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग, मोबाईल नंबर, email, पद ई. नोडल  ऑफिसर हे शाळेचे मुखाध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे कर्मचारी असावेत.नोडल ऑफिसर यांची माहिती आधार वरील माहितीशी मॅच झाल्यानंतर otp येईल त्यानंतरच तुम्ही प्रोफाईल update करू शकाल त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा.शाळेच्या नोडल ऑफिसर यांची माहिती भरून झाल्यानंतर institute Head Login या लॉगिन मधून शाळेच्या मुख्याध्यापक यांची माहिती भरा. Head of institute मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकयांची माहिती भरा.

◾️मुख्याध्यपक यांचे आधार कार्ड वरील नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पद इत्यादी.सर्व माहिती अचूक भरले नंतर final submit या बटणावर क्लिक करा.


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याची तारीख 30/09/2022 पर्यंत देण्यात आलेली आहे. तसेच शाळा स्तरावर फॉर्म

व्हेरिफिकेशन करण्यासाठी 16/10/2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी मुदत 30/09/2022 पर्यंत फॉर्म भरता येतील.

शाळांसाठी मुदत

16/10/2022 पर्यंत शाळांना फॉर्म व्हेरिफिकेशन करता

येतील.

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा


नवीन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी- Link

नुतनीकरण विद्यार्थी – Link

शाळा स्तरावर अर्ज भरून घेण्यासाठी PDf

डाऊनलोड  

माहिती पत्रक- डाउनलोड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖