शिक्षकांसाठी MA एज्युकेशन ( YCMOU)

एम. ए. (शिक्षणशास्त्र) शिक्षणक्रमाविषयी संपूर्ण माहिती


✴️ शिक्षकांसाठी MA Education

शिक्षणशास्त्र हे सामाजिकशास्त्र आहे. या शास्त्रातही पदव्युत्तर पदवी एम. ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रम असावा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने सन २००१ साली त्याचा अभ्यासक्रम आकृतिबंध (Curriculum) प्रसिद्ध केला व त्यात एम.ए. शिक्षणशास्त्र यास पदव्युत्तर पदवीचा विषय म्हणून मान्यता दिलेली आहे.एम. ए. शिक्षणशास्त्र निष्णात शिक्षणक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणातील विविध घटकांचा अभ्यास करावा असे अपेक्षित आहे. विविध पातळींवरील सेवांतर्गत प्रशिक्षण, धोरण विकसन, चिकित्सा,शिक्षण प्रणालीचे मूल्यमापन यासाठी निष्णात व्यक्तींची आवश्यकता आहे. काळानुरूप शिक्षण प्रक्रियेत होत गेलेले बदल अभ्यासणे गरजेचे आहे. शिक्षणशास्त्र ही विद्याशाखा आंतरज्ञानशाखीय (Multi disciplinary) आहे. त्यामुळे तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र,इतिहास, व्यवस्थापनशास्त्र अशा अनेकविध विद्याशाखांमधून विविध तत्त्व, प्रणाली शिक्षणास मिळालेल्या आहे. या सर्वांचा अभ्यास एम.ए.शिक्षणशास्त्र निष्णात व्यक्तींनी करणे गरजेचे आहे. शिवाजी विद्यापीठात पदवी पातळीवर बी.ए. शिक्षणशास्त्र राबविण्यात येत आहे. तर ओरिसा, आसाम आणि मुंबई विद्यापीठानेही एम.ए. शिक्षणशास्त्र हा शिक्षणक्रम सुरू केलेला आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेल्या एम.ए. शिक्षणशास्त्र ह्या
पदवीची दखल नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एन.सी.टी.ई.)या संस्थेनेही घेतलेली असून डी. एड. / बी.एड. महाविद्यालयात शिकविण्यासाठी एम.एड./एम.ए. शिक्षणशास्त्रास मान्यता दिलेली आहे. (नियम क्र. २९/११/१९९५, (Annex-A) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध स्तरांवरील कार्यरत शिक्षकांना दैनंदिन कार्याशी निगडित पदव्युत्तर पदवी घेण्याच्या दृष्टीने मुक्त विद्यापीठाने उचललेले हे एक नवे पाऊल आहे.
◾️ उद्दिष्टे
▪️पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा शिक्षणक्षेत्रातील सहभाग स्पष्ट करणे.
▪️सामाजिक बदलाचा शिक्षणातील सहभागावर झालेला परिणाम स्पष्ट करणे.
▪️मानसशास्त्रातील विविध शाखांमधून शिक्षणशास्त्र कसे विकसित झाले ह्याचे आकलन वृद्धिंगत करणे.
▪️शैक्षणिक मानसशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, शिक्षणाचे समाजशास्त्र, मूल्यमापन, इत्यादी क्षेत्रांतील ज्ञानपातळी उंचावण्यास मदत करणे.
▪️शैक्षणिक संशोधनासाठी आवश्यक ते ज्ञान, दृष्टी, कौशल्ये विकसित करणे.
▪️शैक्षणिक नियोजन, प्रशासन, निरंतर व अनौपचारिक शिक्षण, शैक्षणिक तंत्रविज्ञान, प्रौढ शिक्षण या क्षेत्रांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करणे.

◾️ प्रवेश प्रक्रिया व प्रवेश पात्रता

(१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयातील बी. ए. पदवी उत्तीर्ण किंवा

(२) यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पदवीच्या किमान द्वितीय वर्षापर्यंत शिक्षणशास्त्र विषय घेतलेले किंवा

(३) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) उत्तीर्ण झालेले उमेदवार.

किंवा

(४) बी.ए. बी.एड. (एकात्मिक) उत्तीर्ण किंवा बी.एस्सी. बी.एड.(एकात्मिक) उत्तीर्ण. किंवा

(५) बी.एड. (विशेष शिक्षण) उत्तीर्ण.

किंवा

बी. पीएड. पदवी उत्तीर्ण.

किंवा

बी. एड. शारीरिक शिक्षण उत्तीर्ण.

वरील सर्व पात्रतेसाठी खुल्या वर्गासाठी ५५% आणि

मागासवर्गासाठी ५०% गुण आवश्यक आहेत.

◆ एकूण जागा

प्रत्येक अभ्यासकेंद्रावर ५० जागा आहेत. प्रथम प्रवेश घेणाऱ्यास

प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

◾️शिक्षणक्रमाची संरचना

(अ) अभ्यास विषय(आ) श्रेयांकाधारित : १६ सैद्धान्तिक विषय : (२) विषय ०८ श्रेयांक : ०६ श्रेयांक: ८०: २ श्रेयांक: २४ महिने २८०० घड्याळी तास (अंदाजे)(इ) संशोधन(ई) एकूण श्रेयांक(उ) क्षेत्रीय कार्य(ऊ) किमान कालावधी(ए) एकूण अध्ययन तास ह्या शिक्षणक्रमाचा कालावधी २ वर्षांचा असला तरी विद्यार्थी त्याच्या सोईप्रमाणे प्रवेश घेतल्यापासून ४ वर्षांत हा शिक्षणक्रम पूर्ण करू शकेल. ह्या कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यासशिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी पुन्हा चार वर्षांसाठी ज्या वर्षी नोंदणी कालावधी संपतो त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करण्याची संधी देण्यात येते.

◾️ शिक्षणक्रम शुल्क

एम.ए. (शिक्षणशास्त्र) शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठीचे शुल्क पुढीलप्रमाणे आहे.

विद्यापीठ शुल्क (दोन्ही वर्षांचे मिळून )
अभ्यासकेंद्र शुल्क (दोन्ही वर्षांचे मिळून) रु.
अंतिम परीक्षा शुल्क (दोन्ही वर्षांचे मिळून) रु.
एकूण शिक्षणक्रम शुल्क
रु.१२,६००/-
८,४००/-
३,२००/-
एकूण रु.२४,२००/-
विद्यार्थ्यांचा प्रवेश हा प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाला होणार आहे. त्यामुळे दोन वर्षाचे शुल्क स्वतंत्रपणे भरावयाचे आहे. दोन वर्षाच्या विद्यापीठ शुल्काची विभागणी पुढे देण्यात आलेली आहे.
प्रथम वर्ष द्वितीय वर्ष
रु.७,९००/-
रु.७,९००/-
(१) विद्यापीठ प्रथम वर्षाचे ७,९००/- शुल्क हे विद्यापीठाने निर्धारित केलेल्या ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. द्वितीय वर्षासाठी विद्यापीठ शुल्क ७,९००/- ऑनलाईन पद्धतीनेच दुसऱ्या वर्षी भरावयाचे आहे.
(२) अभ्यासकेंद्रावर प्रथम वर्षासाठी ४,२००/- एवढे शुल्क भरावयाचे आहे, तर दुसऱ्या वर्षीच्या प्रवेशानंतर ४,२००/- शुल्क अभ्यासकेंद्रावर भरावयाचे आहे.
(३) दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर online Register Student Admission लिंकवर जाऊन प्रवेश घ्यावा.
त्यासाठी तुमचा PRN व PASSWORD टाकावा. PASSWORD हा yymmdd ह्या format प्रमाणे भरावा. उदा. तुमची जन्मतारीख १५/०२/१९७५ असेल तर ७५०२१५ हा तुमचा PASSWORD असेल.
(४) अभ्यासकेंद्रावर वरील निर्धारित शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास देऊ नये. अशा प्रकारची शुल्काची मागणी केल्यास तातडीने विद्यापीठाकडे लेखी संपर्क साधावा.
◾️कालावधी
एम.ए. (शिक्षणशास्त्र) शिक्षणक्रमाची किमान कालमर्यादा चोवीस महिन्यांची आहे. मूळ शुल्कामध्येच जास्तीत जास्त चार वर्षे नोंदणी राहू शकेल. या कालावधीत विद्यार्थ्याला अंतिम परीक्षेसाठी १ + ८ संधी उपलब्ध होतील. चार वर्षांनंतर नोंदणी आपोआप रद्द होईल. चार वर्षांनंतर विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्याला पुन्हा नोंदणी करता येईल. त्याची मुदत चार वर्षांची असेल. पुननोंदणी शुल्क म्हणून (ज्या वर्षी नोंदणी कालावधी संपतो) त्या वर्षाच्या मुक्त विद्यापीठाच्या नियमित एम.ए. (शिक्षणशास्त्र) शिक्षणक्रमासाठी असलेले शुल्क भरावे लागेल किंवा विद्यापीठाने निर्धारित केलेले शुल्क भरावे लागेल.
◾️ माध्यम
या शिक्षणक्रमासाठी पुरविण्यात येणारे सर्व अध्ययन- साहित्य मराठी माध्यमातून असेल. मात्र उत्तरे लिहिण्यासाठी पूर्वपरवानगीने हिंदी वा इंग्रजी यांपैकी एका माध्यमाचा वापर करता येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मात्र मराठी व इंग्रजीतच उपलब्ध होतील. त्यातील मराठी प्रश्नपत्रिका कायद्यानुसार वैध मानण्यात येतील.
◾️ अध्ययन साहित्य
सन २०२२-२४ तुकडीपासून नवीन अभ्यासक्रम रचना करण्यात
आलेली आहे. त्यामुळे मुद्रित / ऑनलाईन अध्ययन साहित्य उपलब्ध होईल.

येथून संपूर्ण माहिती पुस्तिका👉 डाऊनलोड करा

✴️अर्ज करण्यासाठी क्लिक करा👇👉 https://ycmou.digitaluniversity.ac/


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Ycmou इतर अभ्याक्रम👇

01) बि.ए.प्रथम वर्ष /F.Y.BA 

      प्रवेश पात्रता:- A) First Year साठी इयत्ता 12 वी पास किंवा य.च.म.मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी पास, किंवा दोन वर्षीय पूर्णवेळ ITI, D.Ed, D.Pharm, MCVC, Nursing, शेतकी शाळा अशी कोणतीही दोन वर्षीय पदवी / पदविका पास.

 B) वय 18 वर्षे पुर्ण असावे.


टिप.:- D.T.Ed ला द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी D.T.Ed. सोबत BA First Year ला एडमिशन घेऊ शकतात.


2) बि.ए द्वितीय वर्ष /S.Y.B.A.

प्रवेश पात्रता खालील प्रमाणे

    A) य.च.मुक्त विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2021-22  किंवा त्यापूर्वी F.Y.B.A.ला एडमिशन घेतलेले सर्व विद्यार्थी S.Y.B A. ला प्रवेशघेण्यासपात्रआहेत.

B) पारंपारिक/ रेग्युलर विद्यापीठात (ऊदा.संत गाडगे बाबा आमरावती विद्यापीठ,  डाॅ बा.आ.मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ अश्या विद्यापीठात) F.Y.B.A. ला पास असलेले विद्यार्थी,  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात S.Y.B.A.ला प्रवेश घेऊ शकतात.


03) बि.ए.तृतीय वर्ष/ T.Y.B.A

प्रवेश घेण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे.

    A) य च.म.मुक्त विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2021-22 किंवा त्यापूर्वी S.Y.B.A.ला शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

B) पारंपारिक/रेग्युलर विद्यापीठात S.Y.B.A.पास विद्यार्थ्यांस T.Y.B.A. ला प्रवेश घेता येईल. मात्र रेग्युलर विद्यापीठात तुम्ही अभ्यासलेले विषय य.च.म.मुक्त विद्यापीठात व संबंधित अभ्यासकेंद्रात आहे किंवा नाही याची चौकशी करून घ्यावी. 


04) बि.काॅम.प्रथम वर्ष/F.Y.B.COM.

प्रवेश पात्रता वरील बि ए.प्रथम वर्षाप्रमाणे.


05) बि.काॅम द्वितीय वर्ष/SY.B.COM.

 प्रवेश पात्रता A) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात 2021-22 ला किंवा त्या पूर्वी F.Y.B.COM ला शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी SY.B.COM ला प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

B) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  अमरावती विद्यापीठ,  नागपूर विद्यापीठ या सारख्या पारंपारीक विद्यापीठात F.Y.B.COM  उत्तीर्ण असणारे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या S.Y.B.COM ला प्रवेश घेऊ शकतात.


06) *लबि.काॅम तृतीय वर्ष/T.Y.B.COM.

य च.म.मुक्त विद्यापीठात 2021-22 मधे किंवा त्या पूर्वी S.Y.B.COM. ला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी T.Y.B.COM  ला प्रवेश घेण्यास पात्र आहेत. 


07) एम.ए. मराठी प्रथम वर्ष    (M54 )

   पात्रता:- UGC मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची तीन वर्षीय कोणतीही पदवी उत्तीर्ण 


08) एम.ए.मराठी द्वितीय वर्ष (M54)

प्रवेश पात्रता:- 2021-22 मधे प्रथम वर्षास प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी द्वितीय वर्षास प्रवेश घेण्यास पात्र आहेत.


09) एम.ए. हिंदी प्रथम वर्ष (M51)

प्रवेश पात्रता :- UGC मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची तीन वर्षीय कोणतीही पदवी उत्तीर्ण 

10) एम.ए.हिंदी द्वितीय वर्ष (M54)  

पात्रता:- य.च.म.मुक्त विद्यापीठात 2021-22 ला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी द्वितीय वर्षास प्रवेश घेण्यास पात्र आहेत. 

.............................................

11) एम.ए.ईंग्रजी प्रथम वर्ष (M72)

प्रवेश पात्रता :-First Year साठी UGC मान्यताप्राप्त कोणत्याही विदयापिठाची कोणतीही तीन वर्षीय पदवी/Degree उत्तीर्ण.

12) *एम.ए.इंग्रजी (M72) द्वितीय वर्ष* 

प्रवेश पात्रता:- य.च.म.मुक्त विद्यापीठात 2021-22 ला किंवा त्या पूर्वी FY.MA ENG (M72) या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

   

13) *एम.काॅम प्रथम वर्ष* (M17)

प्रवेश पात्रता:- First Year साठी UGC मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची B.COM./ BBA/ BBM/ BMS या पैकी कोणतीही एक पदवी/ Degree उत्तीर्ण.

14) *एम.काॅम. द्वितीय वर्ष/ S.Y.M.COM* (M17) 

प्रवेश पात्रता:- य.च.म.मुक्त विद्यापीठात 2021-22 ला किंवा त्यापूर्वी शिकत असलेले सर्व विद्यार्थी एम.काॅम द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यास पात्र आहेत. 

  ..........................................

15) *FY.B.Sc (V92)*

प्रवेश पात्रता : - a) FY.B.SC  साठी इयत्ता 12 वी विज्ञान Mathematics या विषयासह उत्तीर्ण किंवा 10+2 Or  10+3 वर्षीय Engg.Diploma  उत्तीर्ण.

b) वय 18 वर्ष पूर्ण असावे.

टिप. B.Sc ला Compulsory PCM Group/ Subject आहेत.

सेमिस्टर पद्धत आहे.

16) *S.Y.B.SC (V92)*

प्रवेश पात्रता:- य.च.म.मुक्त विद्यापीठात 2021-22 मधे किंवा त्या पूर्वी FY.B.SC (V92)  ला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी S.Y.B.SC  ला प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

17) *T.Y.B.SC (V92)* 

प्रवेश पात्रता:- य.च.म.मुक्त विद्यापीठात 2021-22 किंवा त्यापूर्वी  S.Y.B.SC ला प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत.

  .........................................

08) *F.Y. M.B.A. P79 / एम.बी.ए. प्रथम वर्ष*

प्रवेश पात्रता:- UGC मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची कोणतीही पदवी /Degree  उत्तीर्ण व य.च.मुक्त विद्यापीठाची Entrance मधे Qualify झालेले विद्यार्थी.

     *MBA च्या Entrance परीक्षा व इतर माहीतीसाठी 9552005375 या नंबरवर व्हाट्सअप ला आपले नाव, गाव व मला MBA करायचे आहे असा मेसेज पाठवा.*  MBA बाबत सविस्तर माहीती दिली जाईल 



   टिप:- 

1) य.च.म.मुक्त विद्यापीठात कॅरी ऑन पद्धत आहे. याचा अर्थ असा की प्रथम वर्षाची किंवा द्वितीय वर्षाची परीक्षा दिली नसेल तरीही,  *त्याच अभ्यासक्रमाच्या पुढील वर्गात प्रवेश घेता येतो.* 

2) ऊदा.  FY BA ला परीक्षा दिली नसेल तरी SY.BA ला प्रवेश घेता येतो. किंवा एम ए प्रथम वर्षाचे पेपर दिले नसतील तरीही एम.ए. द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो.

3) प्रवेशासाठी कॅरी ऑन पद्धत असल्याने चालू वर्गाचा Result लागला नाही तरीही चालू अभ्यासक्रमाच्या पुढील वर्गात प्रवेश घेता येतो. 

4) शैक्षणिक वर्ष 2021-22 मधे य.च.म.मुक्त विद्यापीठात प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्षास शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमाच्या पुढील वर्गात प्रवेश घ्यावा.  

4) प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2022 


5) BA, B.COM  व MA ENG हे अभ्यासक्रम वार्षिक परीक्षा पद्धतीचे ( वर्षाच्या शेवटी एकदाच परीक्षा) आहेत.

6) B.Sc , MA MAR, MA HINDI,  M.COM, MBA हे अभ्यासक्रम सेमिस्टर परीक्षा पद्धतीचे आहेत.


        प्रवेश घेण्यासाठी अभ्यासकेंद्राशी दिनांक 10/08/2022 पूर्वीच संपर्क करावा.