PAT 3 वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय.

 PAT 3 वारंवार येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय.

PAT 3 ची माहिती भरताना अनेक समस्या वारंवार येतात या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे 

PAT - 3 माहिती भरताना वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

PAT 3 समस्या व उपाय

🧿समस्या १ - Invalid U-DISE कोड

आपल्या शालार्थ पोर्टलवर शाळेचा UDISE कोड बरोबर असल्याची खात्री करा. चुकीचा UDISE कोड असल्यास मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी /DDO-२ यांनी approval घेण्यात यावे.

तरीही प्रश्न सुटत नसल्यास तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोडची पडताळणी करावी.

🧿समस्या २ - Invalid मोबाईल क्रमांक

सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक मुख्याध्यापक / DDO-१ यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षणअधिकारी/DDO-२ यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतिक्षा करा.

🧿समस्या ३ - Invalid शालार्थ / शिक्षक आय.डी.


मुख्याध्यापक / DDO-१ यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून अचूक शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा.


🧿समस्या ४ - शून्य शिक्षक असलेली शाळा


सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.


🧿समस्या ५ - सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.


शालार्थ पोर्टल व UDISE प्लसवर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.


🧿समस्या ६ मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत.

विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलवर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.


🧿समस्या ७ शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी

सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.

🧿समस्या ८ सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत ~


आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टलवर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल. दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर त्या शाळेत ट्रान्स्फर करावी.


🧿समस्या ९ - केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन


सध्या केवळ शालार्थ प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना सदर माहिती भरता येते. आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाच्या शाळा, सराव पाठशाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, OBC कल्याण व मदरसा इ. शाळांना सध्या माहिती भरण्यास Access देण्यात आलेले नाहीत. याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

येथून-  Pdf डाऊनलोड करा

टीप : आपल्या शाळेतील कोणत्याही शिक्षकाचे लॉग इन होत असेल तर त्यांच्या लॉग इन वरून सर्व इयत्तांची माहिती भरावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विषय-  संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉटवर नोंदविणे करिता ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत

  

दि १५ एप्रिल २०२४ रोजी 

दुपारी १२.०० ते १.०० या कालावधीत जॉईन व्हावे.


प्रशिक्षण  यु ट्यूब लिंक👇👇

 :https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share

👆👆

SCERT मधील विद्या समीक्षा  (VSK), केंद्रामार्फत  PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)गुण  भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावर संकलित मूल्यमापन - २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याबाबत यु-ट्युबद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

कृपया तुमच्या संदर्भासाठी  PAT 3 manual आणि बॉटची लिंक खाली दिले आहेत

PAT 3 - Manual - https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI_QhbVIj2D7qQgW5Zj6/view?usp=sharing 

PAT 3 - Link for Chat Bot -  https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7 

PAT गुण भरणे संदर्भात संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा