शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील ; मात्र जिल्हांतर्गत बदली बाबत ‘प्रशचिन्ह’ ....!

 
 🌈शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील ; मात्र जिल्हांतर्गत बदली बाबत ‘प्रशचिन्ह’ ....!

 

 

👉शिक्षक बदली प्रक्रियेबाबत  मंत्रालय स्तरावर ‘प्रहार’ ची महत्वपूर्ण बैठक

 

✍️थेट मंत्रालयातून रोख-ठोक ,

महेश ठाकरे

राज्याध्यक्ष ,प्रहार शिक्षक संघटना .

भ्र.क्र.७७४५८२३४९२


कोरोना महामारी मुळे राज्यातील शासकीय व खाजगी सर्वच कामे गेल्या दोन वर्षा  पासून ऑनलाईन होत असताना, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मात्र ऑफलाईन करण्याबाबतचे आदेश शासनाकडून कोरोना काळात २०२०-२१ या वर्षी  निर्गमित करण्यात आले होते. परंतु अल्प मुदतीत व तांत्रिक अडचणी समोर येत असल्याचा सूर राज्यातील जिल्हा परिषदेच्या  सीईओ कडून आल्याने अखेर  जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ग्रामविकास स्तरावरून यापूर्वी रद्द करण्यात आलेली होती. मात्र त्याचवेळी  आंतरजिल्हा बदल्यांची यापूर्वीच पार पडलेली  ४ थ्या टप्प्याची अपूर्ण  कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली होती. याबाबत प्रहार शिक्षक संघटनेने शासन स्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यावेळी राज्यातील शिक्षकांच्या १८९० आंतरजिल्हा बदल्या शक्य झाल्यात.आंतरजिल्हा बदलीच्या ४ थ्या टप्प्याअखेर एकूण १२ हजार चे आसपास  आंतरजिल्हा बदल्या राज्यातील विविध जिल्हा परिषद मध्ये झाल्या आहेत.तदनंतर ७ एप्रिल २०२१ रोजी शिक्षकांचे आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीचे सुधारित संगणकीय धोरण अमलात आले.मात्र या धोरणानुसार अद्यापही संगणकीय प्रणाली विकसित  न झाल्याने यावर्षी देखील आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या होतील कि नाही याबाबत राज्यभरातील बदली प्रतीक्षेतील शिक्षक चिंताग्रस्त आहेत.संघटनेकडे राज्यातील अनेक शिक्षक याबाबत दररोज विचारणा करतात ,त्यांच्या या सर्व प्रश्नांची  वस्तुनिष्ठ परिस्थितीजन्य उत्तरे देण्याचा प्रयत्न थेट मंत्रालय स्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेअंती करण्यात आलेला आहे.त्याचा हा सविस्तर वृत्तांत ....  

 

सुधारित धोरणानुसार  संगणकीय प्रणाली द्वारे होणारया आंतरजिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रहार शिक्षक संघटनेची ग्रामविकास व सामान्य प्रशासन स्तरावर महत्वपूर्ण चर्चा  पार पडली.या महत्वपूर्ण चर्चेप्रसंगी आंतरजिल्हा बदली व जिल्हांतर्गत बदली बाबत रोख – ठोक विचारणा करण्यात आली. राज्यातील हजारो शिक्षक बदली प्रतीक्षेत आहेत,त्यांच्या विविध समस्या यावेळी निदर्शनास आणून देण्यात आल्यात. बदलीची संगणकीय प्रणाली अद्यापही पूर्णपणे विकसित नाही , सर्वत्र बदली प्रक्रियेबाबत संभ्रम असतांना सामान्य प्रशासन विभागाने.*“महारष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन २००५"* नुसार राज्यातील सर्व विभागाच्या कार्यरत शासकीय कर्मचारी यांच्या सन २०२२-२३ वर्षी होणाऱ्या बदल्या ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नये असे आदेश दि.२७ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयाने दिले आहेत.

 

वरील सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशा संबंधी बदली इच्छुक अनेक शिक्षक बांधवांनी संघटनेकडे  विचारणा केली.*सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय सर्व विभागाच्या शासकीय कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र सवर्गाच्या अधिकाऱ्यांना लागू आहे.सर्व विभागाच्या सेवे विषयी ची कार्यवाही , नियमावली ही सामान्य प्रशासन विभागाच्या धोरणानुसार होत असते.किंबहुना कुठल्याही विभागाच्या कर्मचारी यांच्या बदली बाबतची नियमावली अथवा शासन निर्णय देखील सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनेच अंतिम होते.यात ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्ग देखील अंतर्भूत आहे.* तेंव्हा पर्यायाने नुकतेच आलेले सामान्य प्रशासन विभागाचे बदल्या बाबतचे आदेश हे शिक्षक बदल्यांना देखील लागू आहेत.यात शंकाच नाही.मात्र तरीही आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील शिक्षक बांधवांचा संभ्रम दूर व्हावा व बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने आग्रही भूमिका घेऊन मार्ग काढण्याच्या उद्देशाने सामान्य प्रशासन ( विस्तार ) विभागाचे सह सचिव सं.द. सूर्यवंशी यांचेशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .

 

याबाबत सविस्तर ,

 

*➡️आंतरजिल्हा बदली प्रक्रिये बाबत..

 

 “महारष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियमन २००५” नुसार राज्यातील सर्व विभागाच्या कार्यरत शासकीय कर्मचारी यांच्या सन २०२२-२३ वर्षी होणाऱ्या बदल्या ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नये असे आदेश दि.२७ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयाने दिले आहेत.याबाबत विचारणा केली ,असता हा निर्णय मा.राज्यपाल यांच्या संमतीने महाराष्ट्र शासन राज्यपत्र ,दि.१२ मे २००६ रोजीच्या अधिनियमन नुसार घेण्यात आलेला आहे.*कलम ४ मधील मुद्दा क्रमांक २ नुसार सक्षम प्राधिकारी प्रत्येक वर्षीच्या जानेवारी महिन्यात त्या वर्षीच्या एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र होतील अश्या कर्मचारी यांची यादी करतील व वर्ष्यातून एकदा एप्रिल व मे महिन्यात बदल्या करतील असे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.* मात्र यानंतर विलंबाने होणारया बदल्यांना ,बदल्यांचे विलंबास प्रतिबंध अधिनियमन २००५ नुसार प्रतिबंध करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.*मात्र याच राजपत्रात नमूद कलम ४ मधील मुद्द्याकडे संघटनेच्या वतीने लक्ष वेधण्यात आले .या मुद्द्यानुसार शासकीय कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या सामान्यपणे वर्ष्यातून केवळ एकदाच एप्रिल किंवा मे मध्ये करण्यात येतील असे असले तरी , नव्याने निर्माण झालेल्या पदावर , किवा सेवानिवृत्ती, पदोन्नती , राजीनामा, पदावनती , पुन्हास्थापना यामुळे रिक्त झालेल्या पदांवर वर्ष्यातील कोणत्याही वेळी  बदल्या करता येतील असे नमूद आहे.* या मुद्द्यानुसार आंतरजिल्हा बदल्या ह्या कोणत्याही वेळी होऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले.आंतरजिल्हा बदल्यांना या पत्राने कुठलीही अडचण नाही .याबाबत आपले स्तरावरून ग्रामविकास विभागाला आदेश देण्यात यावे अशी मागणी सह सचिव मा. श्री. सूर्यवंशी साहेबांना यावेळी करण्यात आली .याबाबत कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने आंतरजिल्हा बदलीचा मार्ग सुकर झाला आहे.

 


*➡️जिल्हांतर्गत बदली प्रक्रिये बाबत..

 

सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त शासन निर्णय दि. २७ मे २०२२ रोजीच्या आदेशाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अडसर निर्माण झाला आहे.महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१२ मे २००६ व बदल्यांचे विनियमन विलंब प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार शिक्षकांच्या सुधारित संगणकीय प्रणाली ने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला अडसर निर्माण होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.कायद्यासमोर शासन निर्णय नाही.उलट शासन निर्णयात कायद्याने बदल होऊ शकतो .असे असले तरी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया व्हावी यासाठी आग्रही भूमिका यावेळी घेण्यात आली .जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया वेळीच पूर्ण करण्यासाठी संगणकीय प्रणाली अद्याप पूर्णपणे विकसित नाही .अश्यातच आधी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होणार असल्याने जून महिना निघून जाईल तेव्हा जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही जुलै मध्ये होणे शक्य नाही असे चित्र आहे.मात्र संघटनेची आग्रही भूमिका पाहता जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला *मा.मुख्यमंत्री महोदय यांनी मान्यता दिल्यास प्रक्रिया होऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले.याबाबत ग्रामविकास मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ साहेब यांचे कडे पाठपुरावा करण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू यांचे उपस्थिती मध्ये संघटनेने दिलेल्या निवेदनावरून महत्वपूर्ण बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.


यापुढील अद्यावत वृत्तांत संघटनेच्या वतीने  लवकरच कळविण्यात येईल .



🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺