👇👇
YCMOU विद्यापीठाच्या सेवांतर्गत बी.एड शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया
माहिती पुस्तिका👉 डाऊनलोड
प्रवेश पात्रता :
पुढील प्रकारच्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जात
नाही आणि अशी आवेदनपत्रे प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व उमेद्वारास याबाबत कळविले जाणार नाही.
(१) ज्यांच्या सेवा आदेशात शिक्षक नियुक्ती असा
उल्लेख नाही.
(२) सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे
(३) अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज
(४) सध्या सेवेत नसलेले अध्यापक.
(५) तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक.
(६) यू.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे
पदवीधारक.
(७) माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक/प्रयोगशाळा सहायक/कनिष्ठ सहायक ।लिपिक, ग्रंथपाल, इत्यादी.
(८) पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेले, परंतु
निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र
किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.
(९) बालवाडीत शिकविणारे अध्यापक.
(१०) तांत्रिक विद्यालये, कृषी विद्यालये तत्सम अन्य
विद्यालये, एम.सी.व्ही.सी. निदेशक (Instructor) हे
प्रवेशासाठी पात्र नाहीत.
(११) प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे
तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे
शिक्षक प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापकच
स्वतः उमेदवार असेल, तर संस्थेचे सचिव वा
शिक्षणाधिकारी यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
(१२) मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले विद्यार्थी अपात्र
ठरतील.
(१३) राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र / ना सायस्तर नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार राखीव प्रवर्गातून प्रवेशास
अपात्र ठरतील.
जाहिरात👉