महागाई भत्ता वाढ शासन परिपत्रक

 


शासन परिपत्रक डाऊनलोड करा

👉👉डाऊनलोड👈

शासन निर्णय - 23 नोव्हेंबर 2023
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात
सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित
वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२% वरुन ४६% करण्यात यावा. सदर
महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे
नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

३.महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे
यापुढे लागू राहील.
४.यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात
येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था
व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या
सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११२३१६३३१६१७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.