इयत्ता 1 ली ते 5 वी च्या निपुण कृतीपुस्तिक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कृतिपुस्तिका समजून घेऊ या...
(१) कृतिपुस्तिकेतील कृती या संबंधित इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातील आशय तसेच 'निपुण भारत' अभियानांतर्गत पायाभूत साक्षरतेसाठी निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन निष्पत्तींवर आधारित आहेत.
(२) कृतिपुस्तिकेमधील सर्व कृती विदयार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.
(३) विदयार्थ्याने कृती करताना आवश्यक तेथे पाठ्यपुस्तक व पूरक संदर्भ साहित्याची मदत घ्यावी.
(४) कृती करताना गरज असेल तेथे शिक्षक, कुटुंबातील सदस्य, सहकारी यांनी विद्यार्थ्याला मदत करावी.
(५) 'प्रत्येकमूल शिकू शकते' हा विश्वास मनात बाळगून प्रत्येक विदयार्थ्याला या कृतिपुस्तिकेतील विविध कृतींच्या मदतीने शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे.
(६) कृतिपुस्तिकेतील कृती विदयार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी नसून, त्यांच्या भाषिक कौशल्य विकसनासाठी व संबोधांच्या दृढीकरणासाठी आहेत.
(७) विद्यार्थ्यांना कृती पूर्ण करण्यास पुरेसे स्वातंत्र्य व वेळ दयावा.
(८) कृती पूर्ण करीत असताना शक्य तेथे विदयार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवविश्वाशी सांगड घालण्यात यावी.
(९) कृतिपुस्तिकेतील कृती या नमुना स्वरूपात आहेत. इयत्तेच्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी गरजेनुसार इतर विविध कृतींचे आयोजन शिक्षकांनी करावे.
(१०) सदर विदयार्थी कृतिपुस्तिकेसंदर्भात शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी व्यक्ती यांच्या जर काही सुधारणात्मक सूचना असतील तर त्याचे स्वागत आहे. सदर सूचनांचा विचार करून कृतिपुस्तिकेच्या पुढील आवृत्तीमध्ये योग्य ते आवश्यक बदल केले जातील.
कृतीपुस्तिक डाऊनलोड करा
🔶इयत्ता 1ली👉 डाऊनलोड
🔶इयत्ता 2 री👉 डाऊनलोड
🔶इयत्ता 3 री👉 डाऊनलोड
🔶इयत्ता 4 थी👉 डाऊनलोड
🔶इयत्ता 5 वी👉 डाऊनलोड
🔲अप्रगत विद्यार्थ्यांसाठी पूरक साहित्य