मराठा सर्वेक्षण बाबत संपूर्ण माहिती / मार्गदर्शन

मराठा सर्वेक्षण बाबत संपूर्ण माहिती


मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश.

राज्यात  २३ जानेवारी ते ३१ जाने या कालावधीत हे सर्वेक्षण होणार आहे 

या सर्वेक्षणात  संपूर्ण राज्यातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण होणार असून एकही कुटुंब सुटणार नाही

 पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या निकषांनुसार तयार केलेली प्रश्नावली एका अँप च्या माध्यमातून भरून घेतली जाईल.

यासाठी मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्नावलीचा मार्ग निवडण्यात आला आहे. यासाठी ज्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे त्या लोकांसाठी खास ट्रेनिंग देण्यात येईल

हे  सर्वेक्षण दिवसांमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी शासकीय आणि निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी करतील

मोबाईलवर येणाऱ्या अडचणी कश्या सोडवायच्या

👇

👉मराठा सर्वेक्षण ॲप बाबत

       काल ॲप डाऊनलोड करताना किंवा OTP बाबत अडचणी येत होत्या..तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे...आपल्या सर्व प्रगांकाना ॲप सुरू करून लॉगिन करायला सांगा....अनेक जणांचे ॲप रात्री व आता सुरू झालेले आहेत..आज सर्व प्रगणक कामकाज करू शकतात....कामकाज करताना अडचणी असतील त्या आज व्हॉट्स द्वारा मेसेज करून किंवा कॉल करून जागच्या जागी त्या सोडविल्या जातील अशा सूचना द्या... 

         एक कुटुंब माहिती अनेक जण वारंवार भरत आहेत..म्हणून १०० घरे झाल्यावर देखील २०० घरे sync डेटा मध्ये दाखवत आहेत....एक घर एकदाच भरून डाव्या कोपऱ्यातील सिंक डेटावर जावून दुसरे ऑप्शन निवडून त्यात दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून अन् सिंक डेटा मध्ये तुम्ही भरलेले कुटुंब किती याची आकडेवारी दिसते....त्या खालील अपलोड डेटा नेट सुरू केल्यावरच अपलोड होईल..दिवसभरात १०० कुटुंब भरले असतील तेव्हा संध्याकाळी डेटा अपलोड व्हायला ॲप खूप वेळ ॲप घेते..अन् प्रगणक घाबरून जातात.. डेटा अपलोड होईल किंवा नाही...की दिवसभराची मेहनत वाया जाईल..घाबरण्याचे कारण नाही तसे काहीच होणार नाही अशा सूचना त्यांना द्या....जी माहिती आपण ऑनलाईन / ऑफलाईन नोंदविली ती तुमच्या मोबाईल Ram व इंटरनेट स्पीड नुसार कमी अधिक वेळ लागेल पण सर्व डेटा अपलोड होईल......ज्यांना याची भीती वाटते त्यांनी मद्ये मध्ये नेट ऑन करू ३-४ कुटुंबांनंतर डेटा अपलोड करायला सांगा......म्हणजे अडचणी येणार नाहीत...

जामनेर सुलभक टीम

शासन आदेश 

 क्लिक 

सर्वेक्षण प्रश्नावली

क्लिक

प्रगणक मानके

क्लिक

पर्यवेक्षक मानके

क्लिक

अँप डाउनलोड लिंक

क्लिक

मानधन दर

क्लिक

मोबाईलवर माहिती कशी भरावी

क्लिक

➖➖➖➖➖➖➖➖➖